महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मुंबई-चेन्नई आज आमने-सामने, प्लेऑफसाठी इंडियन्सला विजय आवश्यक - MA Chidambaram Stadium,Chennai

प्लेऑफमध्ये पोहोचायचे असल्यास मुंबईच्या संघाला अजून २ सामने कोणत्याही परिस्थीतीत जिंकावे लागतील

मुंबई-चेन्नई आज आमने-सामने

By

Published : Apr 26, 2019, 2:08 PM IST

चेन्नई - इंडियन प्रीमिअर लीगच्या बाराव्या सत्रात सर्वात प्रथम प्लेऑफमध्ये पोहोचणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ आज मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. हा सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर रात्री ८ वाजता खेळण्यात येणार आहे.


गुणतालिकेत चेन्नई १६ गुणांसह पहिल्या तर मुंबई १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. प्लेऑफमध्ये पोहोचायचे असल्यास मुंबईच्या संघाला अजून २ सामने कोणत्याही परिस्थीतीत जिंकावे लागतील. त्यामुळे मुंबईसाठी येणारा प्रत्येक सामना हा निर्णायक असणार आहे.


या सत्रात मुंबईच्या अनेक खेळाडूंना आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाहीय. त्यामुळे या सामन्यात बलाढ्य चेन्नईवर विजय मिळवायचा असल्यास मुंबईच्या प्रमुखे खेळाडूंना सर्व स्तरात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. मुंबईच्या फलंदाजीची जबाबदारी ही रोहित शर्माल, क्विंटन डीकॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा आणि यांच्यावर असेल. तर गोलंदाजीची कमान जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, मयंक मार्कंडे आणि मिचेल मॅक्क्लिनॅघनवर असेल


चेन्नईत एम. एस. धोनी, सुरेश रैना, आंबती रायडू, केदार जाधव, शेन वॉटसन यांच्यासारखे स्टार फलंदाज आहेत. तर गोलंदाजीत रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, ईम्रान ताहीर हे महारथी असल्याने हा सामना अटीतटीचा होईल, यात काही शंका नाही.


चेन्नई सुपर किंग्ज - एम.एस. धोनी (कर्णधार), रविंद्र जडेजा, सुरेश रैना, केदार जाधव, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, अंबाती रायडू, मुरली विजय, हरभजन सिंग, दीपक चहर, केएम असिफ, एन जगदिसन, मोनु सिंग, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, ड्वेन ब्रावो, शेन वॉटसन, फाफ डुप्लेसिस, सॅम बिलिंग्स, इम्रान ताहीर, डेविड विली, मिशेल सॅन्टेनर, लुंगीसानी एन्गिडी, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.


मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पंड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मयंक मार्कंड, राहुल चहर, अनुकुल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तारे, क्विंटन डीकॉक, एव्हिन लेविस, किरॉन पोलार्ड, बेन कटिंग, मिशेल मॅक्लेनाघन, ब्यूरेने हेंड्रिक्स, जेसन बेरेन्डॉन्फ, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत, बरिंदर स्त्रान, पंकज जयस्वाल, रसीख सलाम, युवराज सिंग, जयंत यादव.

ABOUT THE AUTHOR

...view details