पणजी - यूएईत सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी छत्तीसगडमधील चारजणांना अटक केली आहे. हे चारजण पणजी जवळच्या एका अपार्टमेंटमधून सट्टेबाजीचे रॅकेट चालवत होते. सोमवारी पोलिसांनी याची माहिती दिली.
आयपीएल सट्टेबाजी : गोव्यातून चारजणांना अटक
आयपीएलचा हंगाम सुरू झाल्यापासून गोवा पोलिसांच्या विविध पथकांनी सट्टेबाजीविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस अधीक्षक (गुन्हे) शोभित सक्सेना यांच्या म्हणण्यानुसार, बेटिंग टोळीने ५० लाख रुपयांचा सट्टा लावल्याची कबुली दिली आहे.
पोलिस अधीक्षक (गुन्हे) शोभित सक्सेना यांच्या म्हणण्यानुसार, बेटिंग टोळीने ५० लाख रुपयांचा सट्टा लावल्याची कबुली दिली आहे. सक्सेना म्हणाले, "हे लोक छत्तीसगडमधील त्यांच्या ग्राहकांकडून फोनवर सट्टा लावत होते. त्यांच्याकडील अनेक मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. एक लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे, ज्यात जुगार संबंधित सॉफ्टवेअरद्वारे सट्टेबाजी केली जात होती."
रणजोतसिंग चब्रा, सुनील मोटवानी, कपिल तोलानी आणि विनय गंगवानी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व छत्तीसगडमधील रायपूरचे रहिवासी आहेत. आयपीएलचा हंगाम सुरू झाल्यापासून गोवा पोलिसांच्या विविध पथकांनी सट्टेबाजीविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.