महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आयपीएल सट्टेबाजी : आंध्र प्रदेशच्या चार जणांना अटक - ipl betting racket andhra pradesh

अटक केलेले आरोपी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यावर सट्टा लावत होते. त्यांच्याकडून रोख १५,७८५ रुपये, ३२ मोबाइल फोन, दोन लॅपटॉप आणि पाच लाख रुपयांचा मोबाइल कॉन्फरन्स बॉक्स जप्त करण्यात आला आहे.

ipl betting racket busted in andhra pradesh
आयपीएल सट्टेबाजी : आंध्र प्रदेशच्या चार जणांना अटक

By

Published : Oct 14, 2020, 6:49 AM IST

पणजी - उत्तर गोवा जिल्हा पोलिसांनी आयपीएल सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी आंध्र प्रदेशातील केंडोलिम गावातून चार जणांना अटक केली आहे. मंगळवारी कलंगुटे पोलीस ठाण्याचे निरीक्षक नोलास्को रापोसो यांनी ही माहिती दिली. ''पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकला. यातून रोख १५,७८५ रुपये, ३२ मोबाइल फोन, दोन लॅपटॉप आणि पाच लाख रुपयांचा मोबाइल कॉन्फरन्स बॉक्स जप्त करण्यात आला आहे'', असे रापोसो यांनी सांगितले.

अटक केलेले आरोपी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यावर सट्टा लावत होते. आदिरी नागा राजू, इरिंकी व्यंकट गणेश, पिठानी किशोर कुमार आणि रुद्र सूर्यनारायण राजू अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details