कोलकाता - आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सने जोरात तयारी केली आहे. याचाच भाग म्हणून केकेआरने संघाचे नेतृत्व जाहीर केले आहे.
काही दिवसांपूर्वी कोलकाता नाइट रायडर्सने संघाचे नेतृत्व दिनेश कार्तिक ऐवजी शुबमन गिल याच्याकडे द्यावी, अशी मागणी माजी कसोटीपटू आणि केकेआरच्या माजी कर्णधार गौतम गंभीरने केली होती. पण गंभीरची मागणी केकेआरने मान्य न करता कार्तिकवर विश्वास दर्शवला आहे. आज गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम यांनी दिनेश कार्तिकच पुढल्या मोसमात संघाचा कर्णधारपद भूषविणार असल्याचे स्पष्ट केले.
आजच्या आयपीएल लिलावात केकेआरने इयॉन मॉर्गन, पॅट कमिन्स, वरूण चक्रवर्ती, एम. सिद्धार्थ, राहुल त्रिपाठी अशा प्रमुख खेळाडूंना आपल्या संघात मोठी बोली लावून घेतलं आहे. पॅट कमिन्ससाठी तर कोलकात्याने १५ कोटी ५० लाखांची रेकॉर्डब्रेक बोली लावली. दरम्यान, आयपीएलच्या १३ व्या हंगामाला मार्च महिन्याच्या अखेरीस सुरुवात होण्याची शक्यता आहे. यात केकेआर कसे प्रदर्शन करणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे.
हेही वाचा -IPL Auction २०२० LIVE : 'ईटीव्ही भारत'चे खास कव्हरेज, हेटमायरसाठी दिल्लीने मोजले 'इतके' कोटी
हेही वाचा -Exclusive | IPL auction : लिलावाआधी 'ईटीव्ही भारत'ची फिरकीपटू माँटी पानेसरशी खास बातचित