चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला उद्या (शुक्रवार) पासून सुरूवात होणार आहे. त्याआधी जमैकाचा प्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट याने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. बोल्टने आरसीबीची नविन जर्सी परिधान केलेला फोटो ट्विटरवर शेअर करत खास संदेश लिहला आहे. बोल्टच्या या पोस्टवर खुद्द विराट आणि एबी डिव्हिलियर्स यांनी रिअॅक्शन दिली आहे.
बोल्टने ट्विटरवर फोटो शेअर करताना लिहलं आहे की, 'चॅलेंजर्स मी आपणास सांगू इच्छितो मी आजही सर्वात वेगवान आहे.'
बोल्टने त्याच्या ट्विटमध्ये विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांना टॅग केलं आहे. बोल्टच्या या ट्विटला डिव्हिलियर्सने उत्तर दिलं आहे. आम्हाला अतिरिक्त धावांची आवश्यकता असेल तर कुणाला कॉल करायचा हे माहिती आहे, असे उत्तर डिव्हिलियर्स दिले आहे.