मुंबई -आयपीएलच्या १४व्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरूवात होत आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. पण, तत्पूर्वी मुंबईच्या खेळाडूंनी फोटोशूट करून घेतले आणि त्यावेळी ते आगरी गाण्यावर नाचताना दिसले. खेळाडूंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा प्रसिद्ध आगरी गाणं 'एक नारळ दिलाय दर्या देवाला' यावर नाचताना दिसत आहे. यावेळी त्याच्यासोबत विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हेदेखील भन्नाट डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.