चेन्नई - आयपीएल २०२१ चा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आज खेळला जाणार आहे. या सामन्याला सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरूवात होईल. दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेचा प्रारंभ विजयाने करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे दोन्ही संघाचे कर्णधार विदेशी आहेत. उभय संघातील हेड टू हेड आकडेवारी आणि रेकॉर्डसवर एक नजर...
कोलकात विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी आणि रेकॉर्डस...
- उभय संघातील हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास कोलकाताचा पगडा भारी आहे. केकेआरने १२ विजय मिळवले आहेत. तर हैदराबादला ७ सामन्यात विजय साकारता आला आहे.
- सनरायजर्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गनने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १८८ धावा केल्या आहेत.
- सनरायजर्सकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ६१६ धावा केल्या आहेत.
- डेव्हिड वॉर्नरने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शतक देखील झळकावलं आहे.
- केकेआरकडून सर्वाधिक विकेट कुलदीप यादवने (१०) घेतल्या आहेत.
- सनरायजर्सकडून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने (१९) सर्वाधिक गडी बाद केले आहेत.