मुंबई -आयपीएलच्या चौदाव्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी सर्व संघातील खेळाडू आपापल्या संघासोबत जोडले जाऊ लागले आहे. कोलकाता नाइट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम मुंबईत दाखल झाले आहेत. याची माहिती त्यांनी खुद्द ट्विटद्वारे दिली.
मुंबईत दाखल झाल्यानंतर मॅक्युलम यांनी ट्विट केला आहे. यात त्यांनी, मुंबईत परत आल्याचा आनंद आहे. केकेआर रायडर्स आणखी एका रोमांचक आयपीएल हंगामाची वाट पाहत आहेत, असे म्हटलं आहे.