महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2021 : किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नावात केला बदल - ipl 2021 news

आयपीएल २०२१ च्या लिलाव प्रकियेआधी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आपल्या नावात बदल केला आहे. आता पंजाबचा संघ, हा संघ 'पंजाब किंग्ज' या नावाने ओळखला जाणार आहे.

IPL 2021: Kings XI Punjab Renamed Punjab Kings Ahead Of Season
IPL 2021 : किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नावात केला बदल

By

Published : Feb 17, 2021, 6:59 PM IST

मुंबई - आयपीएल २०२१ च्या लिलाव प्रकियेआधी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आपल्या नावात बदल केला आहे. आता पंजाबचा संघ, हा संघ 'पंजाब किंग्ज' या नावाने ओळखला जाणार आहे. पंजाबच्या संघाने आपल्या नावात बदल केल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला आतापर्यंत एकदाही स्पर्धेचे विजेतपद प्राप्त करता आलेले नाही. त्यामुळे नव्या नावासह आणि लोगोसह नव्या दमाने यंदाच्या स्पर्धेत उतरण्याची तयारी पंजाब किंग्जने केली आहे.

पंजाब किंग्ज संघाचे मोहिम बुरमन, नेस वाडिया, प्रिती झिंटा आणि करण पौल हे सहमालक आहेत. मागील १३ हंगामात पंजाब संघाला २०१४ साली उपविजेतेपद आणि २००८ सालच्या स्पर्धेत तिसऱ्या स्थानापर्यंत झेप घेता आली होती. आयपीएलच्या १३ हंगामात पंजाबच्या संघाला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

हेही वाचा -IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित २ कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हेही वाचा -IPL २०२१ लिलाव : या ५ विदेशी खेळाडूंवर असणार खास नजर

ABOUT THE AUTHOR

...view details