चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. ९ एप्रिलला गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. या सामन्याआधी जसप्रीत बुमराहने नेटमध्ये गोलंदाजीचा सराव केला. मुंबईने त्यांच्या अधिकृत इन्साग्राम अकाउंटवरून सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बुमराह नेट्समध्ये गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड यांच्या नेतृत्वात यॉर्कर चेंडूचा सराव करताना पाहायला मिळत आहे. बुमराहच्या भेदक गोलंदाजीचा हा व्हिडिओ आयपीएलपूर्वी विरोधी संघाला नक्कीच चेतावणी देणारा आहे.
दरम्यान, बुमराहने आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. २०२० मध्ये युएई येथे आयोजित करण्यात आलेल्या आयपीएलमध्ये बुमराह गोलंदाजांच्या पर्पल कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. बुमराहने मुंबई इंडियन्ससाठी 15 सामन्यात 27 विकेट्स घेतल्या होत्या. बुमराह मुंबईचा प्रमुख वेगवान गोलंदाज असून त्याने अनेक वेळा संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे.
हेही वाचा -IPL २०२१ : 'या' खेळाडूने आयपीलच्या पावर प्लेमध्ये ठोकली सर्वाधिक अर्धशतके
हेही वाचा -VIDEO : आगरी गाण्यावर मुंबई पलटणचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल