मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी होणाऱ्या लिलाव प्रक्रियेआधी राजस्थान रॉयल्सने ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू स्टिव्ह स्मिथला करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता रॉयल्सनी आणखी एक निर्णय घेतला आहे. त्यांनी श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर कुमार संगकाराला संघाचा क्रिकेट संचालक म्हणून नेमले आहे. राजस्थान रॉयल्सने याची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे दिली.
राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएलचा तेरावा हंगाम फारसा चांगला गेला नव्हता. या हंगामात राजस्थानचा संघ गुणतालिकेत तळाशी राहिला. यामुळे रॉयल्सनीं संघात बदल करण्यास सुरूवात केली आहे. यात त्यांनी संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला करारमुक्त करत संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे सोपवले. त्यानंतर आता श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकाराला संघाचा क्रिकेट संचालक म्हणून नेमले आहे.
आयपीएलचा पहिला हंगामात 2008 मध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने विजेतेपद जिंकले होते. यानंतर त्यांना अद्याप विजेतेपद पटकावता आले नाही. आता त्यांनी चौदाव्या हंगामाची तयारी सुरू केली आहे. या हंगामासाठी त्यांनी, संजू सॅमसन (कर्णधार), बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रायन पराग, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, महिपाल लोमरर, कार्तिक त्यागी, अँड्र्यू टाय, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, यशस्वा जैस्वाल, अनुज रावत, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, रॉबिन उथप्पा यांना संघात काय ठेवले आहे. तर स्टिव्ह स्मिथ, अंकित राजपूत, ओशाणे थॉमस, आकाश सिंग, वरुण आरोन, टॉम करन, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंह या खेळाडूंना करारमुक्त केलं आहे.
हेही वाचा -Sri Lanka vs England : अँडरसन एक्सप्रेस सुसाट, ग्लेन मॅग्राथला टाकले मागे
हेही वाचा -सर्वोत्तम कर्णधार कोण ? कोहली की रहाणे, टी नटराजन म्हणतो..