चेन्नई - आयपीएल २०२१ हंगामातील मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सलामीचा सामना चांगलाच रंगतदार झाला. कारण हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. अखेरच्या चेंडूवर बंगळुरूला विजयासाठी एक धाव हवी होती, त्यांनी ही धाव घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबई इंडियन्सने बंगळुरूपुढे विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईचे हे आव्हान बंगळुरूने दोन विकेट्स राखत पूर्ण केले.
दरम्यान, मुंबईने तब्बल ९ वेळा आपला सलामीचा सामना गमावला आहे. आतापर्यंत मुंबईने ४ वेळा सलामीचा सामना जिंकला आहे. मुंबईच्या पराभवानंतर सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल झाले आहेत. यात पहिला सामना देवाला, असे अनेक चाहत्यांनी म्हटलं आहे.