मुंबई - भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता सर्वांना आयपीएलच्या नव्या पर्वाचे वेध लागले आहे. काही महिन्यांपूर्वी यूएईमध्ये आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवण्यात आला. यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर सरशी साधत पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. आता आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी होणारा खेळाडूंचा लिलाव कधी आणि कुठे होईल, याबाबत माहिती समोर आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान होणाऱ्या दुसऱ्या कसोटीनंतर चेन्नई येथेच आयपीएल २०२१ चा लिलाव १८ फेब्रुवारीला पार पडेल.
आयपीएल लिलावाची तारीख ठरली, चेन्नईत होणार लिलाव - आयपीएल २०२१ लिलाव न्यूज
काही दिवसांपूर्वी, आयपीएलमधील फ्रेंचायझींनी रिलिज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली. २० जानेवारी ही खेळाडूंना रिटेन ठेवण्याची शेवटची तारीख होती. तर, ४ फेब्रुवारीपर्यंत ट्रेडिंग विंडो (एका संघातून दुसर्या संघात खेळाडूंचे हस्तांतरण) सुरू राहणार आहे.
काही दिवसांपूर्वी, आयपीएलमधील फ्रेंचायझींनी रिलिज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली. २० जानेवारी ही खेळाडूंना रिटेन ठेवण्याची शेवटची तारीख होती. तर, ४ फेब्रुवारीपर्यंत ट्रेडिंग विंडो (एका संघातून दुसर्या संघात खेळाडूंचे हस्तांतरण) सुरू राहणार आहे. आयपीएल संघांकडून रिलिज झालेल्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (राजस्थान रॉयल्स) आणि ग्लेन मॅक्सवेल (किंग्ज इलेव्हन पंजाब) यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
आठ संघांनी मिळून एकूण १३९ खेळाडूंना संघात कायम केले आहे. तर एकूण ५७ खेळाडूंना मुक्त केले आहे. आता ६१ जागांसाठी १८ फेब्रुवारीला लिलाव होणार आहे. या ६१ जागांपैकी २२ परदेशी खेळाडूंच्या जागेसाठी लिलाव होईल. या लिलावात आयपीएलच्या ठिकाणाचीही चर्चा होईल. आयपीएलसाठी भारताचे ठिकाण असले तरी अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.