मुंबई - आयपीएल २०२१ साठी मिनी लिलाव उद्या (गुरूवार ता. १८) होणार आहे. या लिलावासाठी २९२ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात विदेशी १२८ खेळाडू आहेत. दरम्यान, आठ फ्रेंचायझींकडे एकूण २२ विदेशी खेळाडूंचाच कोटा शिल्लक आहे. यामुळे विदेशी खेळाडूंवर तगडी बोली लागू शकते. यात पाच असे खेळाडू आहेत ज्यांच्यावर खास नजर असणार आहे. वाचा कोण आहेत ते खेळाडू...
ग्लेन मॅक्सवेल -
आयपीएल २०२१ च्या लिलावात मॅक्सवेलवर खास नजर असणार आहे. मॅक्सवेलसाठी आयपीएलचा मागील हंगाम फारसा चांगला राहिला नाही. त्याला हंगामातील १३ सामन्यात १०८ धावा करता आल्या. यामुळे पंजाबने मॅक्सवेलला रिलीज केलं आहे.
स्टिव स्मिथ -
आयपीएल २०२० मध्ये स्मिथला राजस्थान रॉयल्सने रिलीज करत अचंबित केले आहे. कारण स्मिथने १३ व्या हंगामात ३११ धावा केल्या. पण राजस्थानचा संघ प्ले ऑफ फेरी गाठू शकला नाही. मागील हंगामातील स्मिथची कामगिरी पाहिल्यास त्याच्यावर देखील मोठी बोली लागू शकते.