मुंबई - आकाश चोप्राने चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याआधी एक भाकित वर्तवलं आहे. त्याने चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील सामन्यात चेन्नईचा युवा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरेन गेम चेंजर ठरू शकतो, असे म्हटलं आहे.
मागील हंगामात चेन्नई संघाला आपल्या लौकिकास खेळ करता आलेला नव्हता. पण सॅम कुरेन याने मागील हंगामात चांगली कामगिरी नोंदवत आपली छाप सोडली होती. चेन्नई आणि दिल्ली सामन्याआधी आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सॅम कुरेन बाबत भाकित वर्तवले.
आकाश चोप्रा म्हणाला की, 'दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सॅम कुरेन गेम चेंजर ठरू शकतो. कर्णधार धोनीचा तो आवडता खेळाडू आहे. तो क्रिकेटच्या तिन्ही विभागात जबरदस्त कामगिरी करू शकतो. तो नव्या चेंडूने गोलंदाजी करण्यात पटाईत आहे आणि तो डेथ ओव्हरमध्ये देखील गोलंदाजी करू शकतो.'