महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

युझवेंद्र चहलची यूएईत खास कामगिरी

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ४ षटकांत २४ धावा देत चहलने ३ बळी घेतले. या ३ बळींच्या जोरावर चहल आयपीएलमध्ये यूएईत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. चहलच्या खात्यात यूएईत आता १५ बळींची नोंद आहे.

ipl 2020 yuzvendra chahal becomes leading wicket taker in uae
युझवेंद्र चहलची यूएईत खास कामगिरी

By

Published : Oct 3, 2020, 8:06 PM IST

अबुधाबी - विराटसेनेने राजस्थान रॉयल्स संघाला ८ गड्यांनी मात देत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. राजस्थान रॉयल्स संघाने दिलेले १५४ धावांचे लक्ष्य बंगळुरूने सहज पूर्ण केले. बंगळुरूच्या गोलंदाजांनी राजस्थानला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. यात फिरकीपटू युझवेंद्र चहलने मोठी कामगिरी केली. शिवाय, त्याने एक खास विक्रमही आपल्या नावावर केला.

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ४ षटकांत २४ धावा देत चहलने ३ बळी घेतले. या ३ बळींच्या जोरावर चहल आयपीएलमध्ये यूएईत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. चहलच्या खात्यात यूएईत आता १५ बळींची नोंद आहे. त्याखालोखाल भुवनेश्वर, शमी आणि नरिन आहेत. या तिघांनी प्रत्येकी ११ बळी घेतले आहेत. संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा आणि महिपाल लोमरोर या फलंदाजांना चहलने माघारी धाडले.

आयपीएलमध्ये अपयशी ठरलेल्या विराटने आज कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्याने नाबाद ७२ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. सलामीवीर देवदत्त पडीक्कलसह विराटने दुसऱ्या गड्यासाठी ९९ धावांची भागिदारी केली. देवदत्तने अर्धशतक झळकावले.

ABOUT THE AUTHOR

...view details