दुबई - आयपीएल २०२० मध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सला ३७ धावांनी पराभूत केले. चेन्नईचा हा स्पर्धेतील पाचवा पराभव ठरला. चेन्नईने सात सामन्यात फक्त दोन विजय मिळवले आहेत. बंगळुरूविरुद्ध झालेल्या पराभवानंतर चेन्नई संघाला माजी क्रिकेटपटूंसह नेटिझन्सनीं ट्रोल केलं आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉने चेन्नईच्या पराभवानंतर एक ट्विट केलं आहे. त्यात त्याने, मला भीती वाटते की कदाचित आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे सुवर्ण दिवस संपत आहेत, असे म्हटलं आहे.
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही चेन्नईला लक्ष्य केलं आहे. त्याने, चेन्नईच्या खराब कामगिरीमुळे चाहते निराश झाले हे पाहून वाईट वाटते, हा लढणारा संघ म्हणून ओळखला जायचा पण खराब फलंदाजीमुळे या संघाने निराश केले, असे म्हटलं आहे.