मुंबई -मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारातील श्रीमंत आणि महत्त्वाची स्पर्धा म्हणून इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) ओळखले जाते. या स्पर्धेच्या आगामी हंगामाची सुरुवात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. २९ मार्चला मुंबई इंडियन्सचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर पहिला सामना खेळेल.
हेही वाचा -राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे मुंबई विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्याने याची माहिती दिली. 'मला सांगण्यात आले आहे की, आयपीएल २०२० चा हंगाम वानखेडे स्टेडियमवर २९ मार्च रोजी सुरू होईल', असे या अधिकाऱ्याने सांगितले. देशातील मालिका खेळायच्या असल्याने ऑस्ट्रेलियन, इंग्लंड आणि न्यूझीलंडचे खेळाडू या स्पर्धेच्या सुरुवातील भाग घेऊ शकणार नाहीत.
याच कालावधीत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि इंग्लंड व श्रीलंका यांच्यात २ सामन्यांच्या कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे ४ देशांचे खेळाडू आयपीएलमध्ये सामील होणार नसल्याने आयपीएलच्या तारखेवरून सर्वच संघांची चिंता वाढली आहे.