महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

KKR V RR : ग्रेट माणसाकडून कौतुक, आता मला बोलण्याची गरज नाही; सचिनच्या ट्विटवर शाहरूखची प्रतिक्रिया

केकेआरच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने ट्विट करत खेळाडूंचे कौतूक केले. सचिनच्या या ट्विटला रिट्विट करत शाहरुखने मजेशीर उत्तर दिले आहे.

IPL 2020: "The great man has spoken," says Shah Rukh Khan after Sachin Tendulkar praises KKR
KKR V RR : ग्रेट माणसाकडून कौतुक, आता मला बोलण्याची गरज नाही; सचिनच्या ट्विटवर शाहरूखची प्रतिक्रिया

By

Published : Oct 1, 2020, 5:33 PM IST

दुबई - कोलकाता नाइट रायडर्स संघाने बुधवारी झालेल्या सामन्यात, सुसाट फॉर्मात असलेल्या राजस्थानला पराभवाचा धक्का देत, रॉयल्सची विजयी घोडदौड रोखली. हा सामना पाहण्यासाठी केकेआरचा सहमालक शाहरुख खान कुटुंबीयांसह स्टेडियमवर उपस्थित होता. दरम्यान, या सामन्यानंतर शाहरूख खान आणि महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांनी केलेल्या ट्विटची चर्चा जोरात रंगली आहे.

केकेआरच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने ट्विट करत खेळाडूंचे कौतूक केले. शुबमन गिलची महत्त्वपूर्ण खेळी. त्याने चांगली फटकेबाजी केली. आंद्रे रसेलची छोटेखानी खेळी आणि इयॉन मॉर्गनने अंतिम टप्प्यात केलेल्या धावांमुळे केकेआरला समाधानकारक धावांचा पल्ला गाठला आला. केकेआरच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. त्यांनी सांघिक खेळ केला. नागरकोटीने घेतलेला झेल तर अफलातून होता, तो कसा विसरेन, असे सचिनने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं.

सचिनच्या या ट्विटला शाहरूखने रिट्विट करत मजेशीर प्रतिक्रिया दिली. आता मी काही बोलायची गरज नाही. केकेआर आणि खेळाडू या कौतुकास पात्र आहेत. ग्रेट माणसाने कौतुक केले आहे. युवा खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी पाहून आनंद झाला, असे शाहरुखने सचिनच्या ट्विटला रिट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात गिल आणि मॉर्गन यांनी फटकेबाजी करून केकेआरला ६ बाद १७४ धावांपर्यंत मजल मारून दिली. शुबमनने ३४ चेंडूंत ४७ धावा केल्या. तर मॉर्गनने २३ चेंडूंत नाबाद ३४ धावा जमवल्या. यानंतर गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना वेसण घालत फटकेबाजीपासून रोखले. प्रत्युत्तरादाखल राजस्थान रॉयल्सला ९ बाद १३७ धावा करता आल्या आणि केकेआरने हा सामना ३७ धावांनी जिंकला.

ABOUT THE AUTHOR

...view details