महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

RR vs SRH : आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने-सामने

आयपीएलच्या तेराव्या हंगामात २६वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुपारी खेळला जाणार आहे.

ipl 2020 sunrisers hyderabad vs rajasthan royals match 26 preview
RR vs SRH : आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात भिडत

By

Published : Oct 11, 2020, 12:15 PM IST

Updated : Oct 11, 2020, 4:01 PM IST

दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात २६वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुपारी खेळला जाणार आहे. हा डबल हेडरमधील सामना असून या सामन्यात अष्टपैलू बेन स्टोक्स खेळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सलग पराभवामुळे मनोधैर्य ढासळलेल्या राजस्थान रॉयल्सला सनरायझर्सविरुद्धच्या या सामन्यात विजयी मार्गावर परतण्याची आशा आहे. दुसरीकडे सनरायझर्स आजचा सामना जिंकून दोन गुणांची कमाई करण्यासाठी उत्सुक आहे.

  • आयपीएलमधील रेकॉर्डचा विचार केला असता, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत ११ सामने झाले आहेत. यात सनरायझर्संनी ६ तर राजस्थानने ५ विजय मिळवले आहेत.
    आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने-सामने....

आयपीएल २०२०च्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स सातव्या क्रमांकावर आहे. सलग दोन विजयानंतर त्यांना मागील चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादने सहा सामन्यातील तीन सामने जिंकली असून ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत.

वडील आजारी असल्याने बेन स्टोक्स आयपीएलमधील सुरूवातीचे काही सामने खेळू शकला नव्हता. तो आता राजस्थान रॉयल्स संघामध्ये सामील होण्यासाठी यूएईमध्ये दाखल झाला आहे. त्याचा क्वारंटाइनचा कालावधी देखील शनिवारी पूर्ण झाला आहे. यामुळे तो आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. जोस बटलर, स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन यांनी सुरूवातीच्या सामन्यात चांगली कामगिरी नोंदवली. पण ते सातत्य राखण्यात अपयशी ठरले. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर, राहुल तेवतिया, श्रेयश गोपाल यांनी प्रभावी मारा केला आहे.

दुसरीकडे सनरायझर्सनी मागील सामन्यात जॉनी बेअरस्टो आणि फिरकीपटू राशिद खान यांच्या कामगिरीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबचा ६९ धावांनी पराभव केला होता. यामुळे त्यांचे मनोबल उंचावले आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर लयीत आहे. याशिवाय केन विल्यमसन, मनीष पांडे यांना आपली कामगिरी उंचवावी लागेल. शिवाय युवा प्रियम गर्ग, अब्दुल समद आणि अभिषेक शर्मा यांच्या कामगिरीवर देखील सर्वांच्या नजरा आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाल्यानंतर टी नटराजन चांगली कामगिरी नोंदवत आहे. त्याला फिरकीपटू राशिद खानची चांगली साथ मिळत आहे.

  • राजस्थान रॉयल्सचा संघ -
  • जोस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्रयू टाय, कार्तिक त्यागी, स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयांक मार्कंडेय, महिपाल लोमरोर, ओसाने थॉमस, रेयान पराग, यशस्वी जायसवाल अनुज रावत, आकाश सिंह, डेविड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण आरोन, टॉम कुरेन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी आणि जोफ्रा आर्चर.
  • सनरायझर्स हैदराबादचा संघ -
  • डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, ऋद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप, संजय यादव, फॅबियन अॅलेन, पृथ्वी राज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी नटराजन आणि बासिल थम्पी.
Last Updated : Oct 11, 2020, 4:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details