मुंबई - कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. युवा सलामीवीर शुबमन गिलने शानदार अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकाताने हा सामना सात गडी आणि १२ चेंडू राखून जिंकला. शुबमनच्या या दमदार खेळीनंतर तो कोलकाताचा कर्णधार असायला हवा, असे इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजाने म्हटलं आहे.
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज केविन पीटरसनने ही मागणी केली आहे. त्याने या संदर्भात ट्विट केले आहे. यात तो म्हणतो, शुबमन गिल हा कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार असायला हवा.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तेव्हा कोलकाताच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. कोलकाताच्या गोलंदाजीसमोर हैदराबादच्या संघाला १२ षटकात ४ बाद १४२ धावा करता आल्या. १४३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाताची सुरूवात खराब झाली.