मुंबई- आयपीएलच्या तेराव्या हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईत खेळला जाणार आहे. दरम्यान, सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी आपलं वेळापत्रक जारी केले आहे.
हैदराबादने आपल्या १४ सामन्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. या वेळापत्रकानुसार एक एप्रिल रोजी हैदराबाद संघाचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स संघासोबत होणार आहे. घरच्या मैदानावर तेराव्या सत्राची सुरूवात हैदराबादचा संघ करणार आहे. तर साखळी स्पर्धेतील अखेरचा सामना १५ मे रोजी कोलकाता संघासोबत इडन गार्डनवर होणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ३१ मार्च रोजी आपला पहिला सलामीचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत खेळेल. तर अखेरचा साखळीही नाईट रायडर्ससोबतच १० मे रोजी रॉयल चॅलेंजर्स खेळणार आहे.
सनराइजर्स हैदराबादचा संघ -
-
केन विल्यमसन (कर्णधार) , डेविड वॉर्नर, मनीष पांडे, विराट सिंह, प्रियम गर्ग, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, बिली स्टानलेक, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, मिशेल मार्श, फॅबियन एलन, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, संजय यादव, जॉनी बेयरस्टो, ऋद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, भंवका संदीप, बासिल थंपी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -
-
विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत मान सिंग, देवदत्त पड्डीकल, अॅरोन फिंच, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, उमेश यादव, केन रिचर्डसन, डेल स्टेन, इसुरू उदाना, मोईन अली, पवन नेगी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, क्रिस मॉरिस, पवन देशपांडे, पार्थिव पटेल, शाहबाझ अहमद, जोशुआ फिलिप.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ