अबुधाबी - राजस्थान रॉयल्सचा जोफ्रा ऑर्चर त्याच्या वेगवान गोलंदाजी आणि बाऊंसरचा मारा करण्यासाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर तो विरोधी संघाच्या गोटात खळबळ माजवत आहे. इतकेच नव्हे तर, तो क्षेत्ररक्षणात देखील आपले मोलाचे योगदान देत आहे. रविवारी झालेल्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात जोफ्राने एक भन्नाट झेल टिपला. याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर असून, जोफ्राच्या क्षेत्ररक्षणावर भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलरकरने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय घडलं -
अबुधाबीमध्ये राजस्थान आणि मुंबई यांच्यात सामना झाला. मुंबईच्या प्रथम फलंदाजीदरम्यान, इशान किशन मैदानात होता. त्याने कार्तिक त्यागीने टाकलेल्या ११ व्या षटकात एक चेंडू टोलावला. हा चेंडू सीमारेषेवर उभा असलेल्या जोफ्राने उडी घेत एका हाताने झेलला. जोफ्राने पकडलेला झेल पाहून मैदानात असणाऱ्या रियान पराग, गोलंदाज कार्तिक त्यागी अचंबित झाले. इतकेच नव्हे तर, समालोचकांनी देखील जोफ्राने पकडलेल्या झेलचे तोंडभरून कौतूक केले.
काय म्हणाला सचिन -