दुबई- विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने सनरायझर्स हैदराबाद संघावर 10 धावांनी विजय मिळवला आहे. हैदराबाद विरुद्ध गोलंदाजी करताना बंगळुरुच्या यजुर्वेंद्र चहलने 4 षटकांत 18 धावा देत सर्वाधिक 3 बळी मिळवले. त्याच्यासोबत शिवम दुबेने 3 षटकांत 15 धावा देत 2 बळी घेतले. तर नवदीप सैनी याने 2 आणि डेल स्टेन याने एक बळी मिळवला.
हैदराबादकडून जॉनी बेअरस्टॉ याने 43 चेंडूत सर्वाधिक 61 धावा केल्या. त्यापाठोपाठ मनिष पांडे याने 34 आणि प्रियांम गर्ग याने 12 धावा केल्या. कर्णधार डेव्हिड वार्नर तर 6 धावांवर धावचित झाला. बंगळुरु संघाच्या उमेश यादवने त्याला धावचित केले. विजय शंकर आणि मिशेल मार्श दोन्ही शून्यावरच बाद झाले. तर उर्वरित जणांना दुहेरी धावसंख्यादेखील गाठता आली नाही. 19.4 षटकांत हैदराबादचा संपूर्ण संघ बाद झाला आणि विराटच्या बंगळूरु संघाने आयपीएलच्या 13 व्या सत्रात आपला पहिला विजय नोंदवला.
तत्पूर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या बंगलुरू संघाने पडिक्कल व ए. बी. डिव्हिलियर्सच्या तडाखेबंद अर्धशतकांच्या बलावर १६३ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर देवदत पडीकल आणि फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी करून मजबूत धावसंख्येचा पाया रचला.
आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या देवदत पडीक्ललने फिंचच्या साथीने हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पडीक्कलने पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करत आपला संघसहकारी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला. चांगल्या सुरुवातीनंतर आरसीबीच्या मधल्या फळीने निराशा केली.
पडीक्कल व फिंच एकापाठोपाठ बाद झाल्याने आरसीबीच्या धावांना ब्रेक लागला. विजय शंकरने पडीक्कलला आणि अभिषेक शर्माने फिंचला माघारी धाडत जमलेली जोडी फोडली. विराट कोहलीही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नटराजनच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर राशिद खानकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने १४ धावा केल्या.
दुसऱ्या बाजूने डिव्हीलियर्सने अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकून फटकेबाजी केली. शिवम दुबेने त्याला चांगली साथ दिली. अखेरच्या षटकात चोरटी धाव घेताना डिव्हिलियर्स धावबाद झाला. हैदराबादकडून विजय शंकर, अभिषेक शर्मा आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
LIVE UPDATE -
- हैदराबादला तिसरा धक्का बेअरस्टो ६१ धावांवर बाद
- १५ षटकात हैदराबादच्या २ बाद १२१ धावा बेअरस्टो ६१ तर प्रियम गर्ग १० धावांवर नाबाद
- बेअरस्टोचे अर्धशतक
- मनिष पांडे ३४ धावांवर बाद. युझवेंद्र चहलने घेतला बळी
- बेयरस्टो ३९ तर पांडे ३१ धावांवर नाबाद
-१० षटकानंतर हैदराबाद मजबूत स्थितीत १ बाद ७८ धावा
- ५ षटकांत हैदराबादच्या १ बाद ४० धावा. बेयरस्टो १५ तर मनिष पांडे १८ धावांवर नाबाद
- डेव्हिड वॉर्नर केवळ सहा धावा काढून धावबाद, हैदराबादला मोठा धक्का
- हैदराबादची डेव्हिड वॉर्नर व जे. बेयरस्टो ही सलामी जोडी मैदानात
----------------------------------------
- २० षटकात आरसीबीच्या ५ बाद १६३ धावा.
- ५१ धावा काढून ए.बी. डि व्हिलियर्स धावबाद
- ए.बी. डि व्हिलियर्सच्या २९ चेंडूत ५० धावा. यामध्ये २ षटकार व ४ चौकारांचा समावेश
- १५.५ षटकांत कर्णधार कोहली १४ धावांवर बाद. थंगरासू नटराजनच्या गोलंदाजीवर राशिद खानने घेतला झेल
- १५ षटकात आरसीबीच्या ११६ धावा, कोहली व डि व्हिलियर्स १३-१३ धावांवर नाबाद
- कर्णधार विराट कोहली, ए.बी. डि व्हिलियर्स ही आक्रमक जोडी मैदानात
- फिंचने २७ चेंडूत २९ धावा केल्या. त्यामुळे २ षटकार व एका चौकाराची समावेश आहे.
-१२ षटकातील पहिल्याच चेंडूवर अभिषेक वर्माने फिंचला एलबीडव्ल्यू बाद केले.
- आरसीबीला सलग धक्के पडिक्कलपाठोपाठ आरोन फिंचही तंबूत
- पडिक्कलने ४२ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ५६ धावा फटकावल्या
- ११ षटकात हैदराबादला पहिले यश, विजय शंकरच्या गोलंदाजीवर पडिक्कल ५६ धावांवर त्रिफळाचीत
-आरसीबीच्या १० षटकात ८६ धावांची जोरदार सलामी
- देवदत्त पाडिक्कलच्या ३६ चेंडूत ५१ धावा. देवदत्तचे पदार्पणातच अर्धशतक
- पदार्पणातच आरसीबीच्या देवदत्त पडीक्कलनं पॉवर प्लेमध्ये तुफान फटकेबाजी करून SRHच्या गोलंदाजांना हैराण केलं.
-पडीकलची फटकेबाजी, ३३ चेंडूत ४३ धावा, तर फिंचच्या २१ चेंजूत २१ धावा
७ षटकात बंगळुरूच्या बिनबाद ५९ धावा.
RCB ने पहिल्या सामन्यासाठी जोश फिलीपकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली असून वॉशिंग्टन सुंदर आणि चहल यांना संघात स्थान देण्यात आलंय. .
- बंगळुरूकडून अरोन फिंच व देवदत्त पाडिक्कल ही सलामी जोडी मैदानात.
- 07.00 pm: हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी आहे हैदराबादची प्लेईंग इलेव्हन -
आरसीबीची प्लेईंग इलेव्हन -
दोन्ही संघात आक्रमक फलंदाजांचा समावेश असून काहीजण एकट्याच्या बळावर सामन्याचा निकालास कलाटणी देण्यास सक्षम आहेत. बंगळुरू संघात कर्णधार विराट कोहली याच्यासह ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधार अॅरोन फिंच आहे. याशिवाय एबी डिव्हिलिअर्स, ख्रिस मॉरिस, मोईन अली, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेन स्टेन, मोहम्मद सिराज असे मजबूत खेळाडू देखील आहेत.
दुसऱ्या बाजूला सनरायजर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने या स्पर्धेत तीनवेळा ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सनरायजर्सने २०१६ मध्ये विजेतेपद पटकावले होते. यावेळी वॉर्नरसोबत जॉनी बेयरस्टॉ सलामीला उतरणार आहे. याशिवाय सनरायजर्स संघात केन विलियम्सन, मनीष पांडे, मिशेल मार्श, फॅबियन अॅलेन आणि राशिद खान यांच्यासारखे खेळाडू आहेत.
दोन्ही संघ खालीलप्रमाणे -
- आरसीबीचा संघ -
- विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, ख्रिस मॉरिस, जोश फिलिप, मोइन अली, अॅरोन फिंच, एबी डिविलियर्स, शहबाज अहमद, पार्थिव पटेल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, इसुरु उडाना, डेन स्टेन, पवन नेगी, देवदत्त पड्डीकल, शिवम दुबे, उमेश यादव, गुरुकीरत मान सिंह, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे आणि अॅडम झम्पा.
- सनरायजर्स हैदराबादचा संघ -
- डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अभिषेक शर्मा, बासिल थाम्पी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टानलेक, जॉनी बेयरेस्टो, केन विलियमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, ऋद्धिमान साहा, विराट सिंह, प्रियम गर्ग, मिशेल मार्श, संदीप बावनका, फॅबियन अॅलेन, अब्दुल समद आणि संजय यादव.