महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2020 : मुंबई इंडियन्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांची 'हेड डू हेड' आकडेवारी आणि रेकॉर्ड - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू वि मुंबई इंडियन्स

आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरू यांच्यात मुकाबला होणार आहे.

ipl 2020 rcb vs mi head to head stats and numbers
IPL 2020 : मुंबई इंडियन्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांची हेड डू हेड आकडेवारी आणि रेकॉर्ड

By

Published : Sep 28, 2020, 2:26 PM IST

आबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरू यांच्यात मुकाबला होणार आहे. आरसीबी आणि मुंबई हे दोन्ही लोकप्रिय संघ असल्याने, या सामन्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत या दोन्ही संघात अनेक सामने झाली आहेत. यात कोणता संघ वरचढ ठरला आहे. काय आहे इतिहास जाणून घ्या...

  • मुंबई-बंगळुरू यांच्यातील हेड टू हेट आकडेवारीत मुंबईचा संघ वरचढ ठरलेला आहे. आतापर्यंत मुंबईने आरसीबीवर १८ विजय मिळवले आहेत. तर, आरसीबीला फक्त ९ सामन्यात विजय साकारता आला आहे.
  • मागील ५ सामन्यांचा विचार केल्यास केवळ एकदाच आरसीबीचा संघ विजयी ठरला आहे.
  • भारताबाहेरची आकडेवारी पाहिल्यास २००९ साली दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या आयपीएल हंगामात दोन्ही संघानी एकमेकांविरोधात एक-एक सामना जिंकला होता.
  • यूएईमधील आकडेवारी पाहिल्यास आरसीबीने मुंबईविरोधातील सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला होता.
  • खेळाडूंची कामगिरीत मुंबईच्या केरॉन पोलार्डने आरसीबीविरुद्ध सर्वाधिक ४७३ धावा केल्या आहेत.
  • आरसीबीकडून मुंबईविरोधात सर्वाधिक धावा विराट कोहलीने केल्या आहेत. त्याने ६२५ धावा केल्या आहेत.
  • गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने ११ सामन्यात आरसीबीचे १३ गडी बाद केले आहेत.
  • युजवेंद्र चहलने ११ सामन्यात मुंबईचे १६ गडी टिपले आहेत.
  • आरसीबीचा संघ -
  • अ‌ॅरोन फिंच, देवदत्त पडीक्कल, पार्थिव पटेल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत मान, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वाशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, अ‌ॅडम झम्पा, इसुरू उडाना, मोईन अली, जोश फिलीपी, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.
  • मुंबई इंडियन्सचा संघ -
  • रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, मिशेल मॅक्लीनागन, मोहसिन खान, नॅथन कॉल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेंट बोल्ट.

ABOUT THE AUTHOR

...view details