दुबई - आयपीएल २०२०च्या गुणातालिकेत प्रत्येक सामन्यागणिक मोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. या सामन्यानंतर हैदराबादच्या संघाने गुणातालिकेत मोठी झेप घेतली तर, तीन वेळा अजिंक्यपद पटकवणारा धोनीचा चेन्नई संघ तळाशीच आहे. चेन्नई आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर गुणतालिकेमध्ये नेमका काय बदल झाला आहे, पाहा...
हैदराबादचा संघाने स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला. आतापर्यंत हैदराबादच्या संघाने चार सामने खेळली आहेत. या चार सामन्यांमध्ये हैदराबादच्या संघाला दोन पराभव मिळाले आहेत, तर त्यांनी दोन विजयही साकारले आहेत. हैदराबादच्या संघाच्या नावावर आता चार गुण जमा झाले आहेत. त्यामुळे हैदराबादचा संघ आता गुणतालिकेत सातव्या क्रमांकावरून थेट चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
दुसरीकडे. चेन्नईचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव ठरला. चेन्नईचा संघ आतापर्यंत चार सामने खेळला आहे आणि त्यांना तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ या गुणतालिकेत तळाला, म्हणजेच आठव्या स्थानावर आहे.