महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२० Points Table : गुणतालिकेत राजस्थानची मोठी झेप, चेन्नई तळाशी - आयपीएल 2020 युएई

राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर सात गडी राखून मोठा विजय मिळवला. या विजयासह राजस्थानने गुणतालिकेत फेरबदल केले. वाचा राजस्थान विरुद्ध चेन्नई सामन्यानंतर गुणतालिकेत नेमके काय बदल झाले...

IPL 2020 Points Table: Rajasthan Royals Win To Go 5th, Chennai Super Kings Sink To Bottom
IPL २०२० Points Table : गुणतालिकेत राजस्थानची मोठी झेप, चेन्नई तळाशी

By

Published : Oct 20, 2020, 1:34 PM IST

दुबई - आयपीएल २०२० मध्ये काल सोमवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर सात गडी राखून मोठा विजय मिळवला. या विजयासह राजस्थानने गुणतालिकेत फेरबदल केले. वाचा राजस्थान विरुद्ध चेन्नई सामन्यानंतर गुणतालिकेत नेमके काय बदल झाले...

चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी राजस्थानचा संघ गुणतालिकेत तळाशी म्हणजे, आठव्या स्थानावर होता. या सामन्यापूर्वी राजस्थानने नऊ सामने खेळली होती. यात त्यांना फक्त तीन विजय मिळवता आले होते, तर राहिलेल्या सहा सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. पण दहाव्या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला आणि दोन गुणांची कमाई करत आठव्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली.

चेन्नईचा संघ राजस्थानविरुद्धच्या सामन्याआधी सातव्या क्रमाकांवर होता. कारण या सामन्यापूर्वी चेन्नईच्या संघाने नऊ सामन्यात फक्त तीन विजय मिळवले होते, तर त्यांना सहा पराभव स्वीकारावे लागले होते. पण दहाव्या सामन्यात चेन्नईला सातवा पराभवही पत्करावा लागला. त्यामुळे गुणतालिकेत चेन्नईच्या संघाची सातव्यावरून आठव्या स्थानावर घसरला आहे.

दरम्यान, गुणतालिकेत दिल्ली १४ गुणांसह अव्वलस्थानावर आहे. तर दुसरे स्थान हे मुंबई इंडियन्सने पटकावले आहे. मुंबई आणि बंगळुरू या दोन्ही संघांचे समान १२ गुण आहेत, पण कमी रनरेटमुळे बंगळुरूच्या संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. गुणतालिकेत चौथ्या स्थानी कोलकाता आहे. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर अनुक्रमे राजस्थान आणि हैदराबाद आहे. सातव्या स्थानावर पंजाब असून चेन्नई आठव्या स्थानावर आहे.

हेही वाचा -DC vs KXIP : दिल्लीसमोर मनोबल उंचावलेल्या पंजाबचे आव्हान

हेही वाचा -'थाला फक्त एकच आणि तो कोण हे सर्वांना माहित आहे', चाहत्याच्या कमेंटवर राहुलचे भन्नाट प्रत्युत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details