दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात कालचा रविवार खास ठरला. कारण कालचे दोन्ही सामने सुपर ओव्हरमध्ये गेले. इतकेच नव्हे तर एक सामना सुपर ओव्हरमध्ये देखील टाय झाला. यामुळे आणखी एक सुपर ओव्हर खेळवण्यात आली. डबल हेडरमधील सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील पहिला सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील लढत देखील सुपर ओव्हरमध्ये गेली. पहिल्या सामन्यात कोलकाताने तर दुसऱ्या सामन्यात पंजाबने बाजी मारली. पंजाबच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठे बदल झाले आहेत. नेमके काय बदल झाले पाहा...
IPL २०२० Points Table : पंजाबची झेप, धोनीची 'चेन्नई एक्सप्रेस' घसरली - आयपीएल २०२० पाॅईंट टेबल न्यूज
मुंबईविरुद्ध पंजाबने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवल्यानंतर गुणतालिकेत मोठे बदल झाले आहेत. नेमके काय बदल झाले पाहा...
![IPL २०२० Points Table : पंजाबची झेप, धोनीची 'चेन्नई एक्सप्रेस' घसरली IPL 2020 Points Table: KXIP Move Up From Bottom After Super Over Thriller vs MI](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9231733-612-9231733-1603099884904.jpg)
मुंबई विरुद्ध पंजाब या सामन्यापूर्वी पंजाबचा संघ तळाशी म्हणजे गुणतालिकेत आठव्या स्थानी होता. पंजाबने या सामन्यापूर्वी ८ सामने खेळले होती. यात त्यांनी ६ सामने गमावले होते. त्यामुळे त्यांना पुढील सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यांनी आठव्या सामन्यात बंगळुरूचा पराभव केला. त्यानंतर काल सुपर ओव्हरमध्ये मुंबईचा पराभव केला. यामुळे त्यांनी गुणतक्त्यात आठव्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानावर उडी घेतली आहे. त्यांनी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांना मागे टाकले आहे.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबईने विजय मिळवला असता तर ते पहिल्या स्थानावर पोहोचले असते. पण आता मुंबईच्या खात्यात ९ पैकी ६ विजयासह १० गुण आहेत. ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, सद्यघडीला दिल्ली १४ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर मुंबईचा संघ आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे बंगळुरू आणि कोलकाताचा संघ कायम आहेत. हैदराबाद पाचव्या स्थानावर आहे. तर पंजाबने आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तर चेन्नई आणि राजस्थान सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत.