शारजाह - आयपीएलच्या नवव्या सामन्यानंतर 'ऑरेंज कॅप' आणि 'पर्पल कॅप' या मानाच्या दोन टोप्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघात विराजमान झाल्या आहेत. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल ऑरेंज कॅप तर, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पर्पल कॅप मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. या सामन्यापूर्वी, चेन्नईच्या फाफ डू प्लेसिसकडे ऑरेंज आणि दिल्लीच्या कगिसो रबाडाकडे पर्पल कॅप होती.
किंग्ज इलेव्हन पंजाबने पटकावल्या आयपीएलच्या दोन्ही 'टोप्या'! - ऑरेंज कॅप आयपीएल २०२० न्यूज
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल पहिल्या क्रमांकावर आहे.
या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने तीन सामन्यांत २२२ धावा केल्या आहेत. त्याच्यामागे राजस्थानविरुद्ध शतक झळकावणारा मयांक अग्रवाल आहे. मयांक राहुलच्या फक्त एक धावेने मागे आहे. तिसर्या क्रमांकावरील फाफ डु प्लेसिसने तीन सामन्यांत १७३ धावा केल्या आहेत.
गोलंदाजांमध्ये शमी तीन सामन्यांमध्ये सात गडी मिळवून प्रथम स्थानावर आहे. दुसर्या स्थानावर दोन सामन्यांत पाच विकेट्ससह कागिसो रबाडा आहे. चेन्नईचा सॅम कुरेन तीन सामन्यांमध्ये पाच बळी घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे.