महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

लोकेश राहुलकडे 'ऑरेंज कॅप', हैदराबादची सहाव्या स्थानी झेप - आयपीएल ऑरेंज कॅप

पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुलने १२ सामन्यांत ५९५ धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसर्‍या क्रमांकावर दिल्लीचा शिखर धवन असून त्याच्या खात्यात १२ सामन्यात ४७१ धावा आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हि़ड वॉर्नर १२ सामन्यात ४३६ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.

ipl 2020 orange cap and purple cap holders
लोकेश राहुलकडे 'ऑरेंज कॅप', हैदराबादची सहाव्या स्थानी झेप

By

Published : Oct 28, 2020, 3:40 PM IST

नवी दिल्ली - आयपीएलच्या ४७व्या सामन्यानंतर लोकेश राहुलने 'ऑरेंज कॅप' स्वत: कडे राखली आहे. तर, 'पर्पल' कॅप दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडे आहे. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते. मंगळवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात हैदराबादने दिल्लीचा ८८ धावांनी धुव्वा उडवत दोन गुणांची कमाई केली.

चालू हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुलने १२ सामन्यांत ५९५ धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसर्‍या क्रमांकावर दिल्लीचा शिखर धवन असून त्याच्या खात्यात १२ सामन्यात ४७१ धावा आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर १२ सामन्यात ४३६ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.

तर, 'पर्पल' कॅप दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडे आहे. रबाडाने १२ सामन्यांमध्ये एकूण २३ बळी घेतले आहेत. त्यानंतर या यादीत पंजाबचा मोहम्मद शमी आहे. त्याच्या खात्यात २० बळी आहेत. हैदराबादचा राशिद खान १२ सामन्यात १७ बळींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

गुणतालिकेची सद्यस्थिती -

सद्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स या संघाने गुणतालिकेतील तिसके स्थान मिळवले आहे. चौथ्या स्थानी पंजाब पोहोचला आहे. तर कोलकाताची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. सहाव्या स्थानावर हैदराबाद आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details