नवी दिल्ली -आयपीएलच्या ४०व्या सामन्यानंतर लोकेश राहुलने 'ऑरेंज कॅप' स्वत: कडे राखली आहे. तर, 'पर्पल कॅप' दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडे आहे. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते.
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या कर्णधाराकडे 'ऑरेंज कॅप'
किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुलने १० सामन्यांत ५४० धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसर्या क्रमांकावर दिल्लीचा शतकवीर शिखर धवन असून त्याच्या खात्यात १० सामन्यात ४६५ धावा आहे.
चालू हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुलने १० सामन्यांत ५४० धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसर्या क्रमांकावर दिल्लीचा शतकवीर शिखर धवन असून त्याच्या खात्यात १० सामन्यात ४६५ धावा आहे. पंजाबचा मयांक अग्रवाल ३९८ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.
तर, 'पर्पल' कॅप दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडे आहे. रबाडाने १० सामन्यांमध्ये एकूण २१ बळी घेतले आहेत. त्यानंतर या यादीत पंजाबचा मोहम्मद शमी आहे. त्याच्या खात्यात १६ बळी आहेत. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने १५ बळी घेतले आहेत. तर, जोफ्रा आर्चरनेही ११ सामन्यांत १५ बळी घेतले आहेत.