नवी दिल्ली - शारजाह येथे शुक्रवारी राजस्थान आणि दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यानंतर 'ऑरेंज कॅप'च्या पहिल्या स्थानासाठी कोणताही बदल झालेला नाही. किंग्ज इलेव्हनचा कर्णधार लोकेश राहुलकडे 'ऑरेंज कॅप' आहे. तर 'पर्पल' कॅप दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडे आहे. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते.
जाणून घ्या आयपीएलच्या प्रतिष्ठित 'टोप्यां'चे मानकरी - ऑरेंज कॅप आयपीएल २०२० न्यूज
आयपीएलमध्ये झालेल्या २३व्या सामन्यानंतर किंग्ज इलेव्हनचा कर्णधार लोकेश राहुलने 'ऑरेंज कॅप' राखली आहे. तर,'पर्पल कॅप' कगिसो रबाडाकडे आहे. रबाडाने पाच सामन्यांमध्ये एकूण १५ बळी घेतले आहेत.
आयपीएलच्या १३व्या सत्रात आतापर्यंत एकूण २३ सामने खेळले गेले आहेत. चालू हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुलने ५ सामन्यांत १३६.६८च्या स्ट्राइक रेटने ३१३ धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसर्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज फाफ डु प्लेसिस आहे. त्याने तीन अर्धशतकांच्या मदतीने २९९ धावा केल्या आहेत. तिसर्या क्रमांकावर मयंक अग्रवाल असून त्याच्या खात्यात २८१ धावा आहे.
तर,'पर्पल कॅप' कगिसो रबाडाकडे आहे. रबाडाने पाच सामन्यांमध्ये एकूण १५ बळी घेतले आहेत. या यादीत मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ११ बळी घेऊन दुसर्या स्थानावर आहे. मुंबईचा ट्रेंट बोल्ट १० बळींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या गुणतालिकेबद्दल सांगायचे झाले तर, दिल्ली कॅपिटल्सचा संघ १० गुणांसह पहिल्या, मुंबईचा संघ ८ गुणांसह दुसऱ्या तर, पंजाबचा संघ २ गुणांसह शेवटच्या स्थानावर आहेत.