दुबई - किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने मयांक अग्रवालकडून 'ऑरेंज कॅप' आपल्याकडे घेतली आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने 'पर्पल कॅप' राखली आहे. रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळलेल्या सामन्यात राहुलने ६३ धावांची खेळी केली. राहुलने पाच सामन्यांत ३०२ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत.
पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलकडे 'ऑरेंज कॅप' - ऑरेंज कॅप आयपीएल २०२० न्यूज
लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते. लोकेश राहुलने मयांक अग्रवालकडून 'ऑरेंज कॅप' आपल्याकडे घेतली आहे.
लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते. राहुलच्या मागे चेन्नईचा फाफ डु प्लेसिस आहे. डु प्लेसिसने पाच सामन्यांमध्ये २८२ धावा केल्या आहेत. रविवारी डु प्लेसिसने नाबाद ८७ धावा केल्या. शेन वॉटसनबरोबर त्याने पहिल्या विकेटसाठी विक्रमी १८१ धावांची भागीदारी करत संघाला दहा विकेट्सने विजय मिळवून दिला.
अबुधाबीमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चहलने २४ धावा देऊन ३ बळी घेतले. चहलकडे ४ सामन्यांत ८ बळी आहेत. चहलशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा आणि मुंबईचा ट्रेंट बोल्ट या गोलंदाजांकडे प्रत्येकी ८ विकेट्स आहेत. चांगली सरासरी आणि इकॉनॉमीमुळे चहल यादीत अव्वल आहे.