अबुधाबी - पंजाबचा सलामीवीर मयांक अग्रवालने संघाचा कर्णधार लोकेश राहुलकडून 'ऑरेंज कॅप' आपल्याकडे घेतली आहे. तर, 'पर्पल कॅप' किंग्ज इलेव्हन पंजाबचा गोलंदाज मोहम्मद शमीकडे आहे. गुरुवारी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब असा सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने पंजाबला ४८ धावांनी मात दिली. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते.
आयपीएल २०२० : मयांककडे 'ऑरेंज कॅप' तर, 'या' गोलंदाजाकडे 'पर्पल कॅप' - ऑरेंज कॅप आयपीएल २०२० न्यूज
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते. पंजाबचा सलामीवीर मयांक अग्रवालने संघाचा कर्णधार लोकेश राहुलकडून 'ऑरेंज कॅप' आपल्याकडे घेतली आहे.
लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मयांक पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने चार सामन्यांत २४६ धावा केल्या आहेत. त्याच्यामागे लोकेश राहुल आहे. राहुलच्या खात्यात चार सामन्यांत २३९ धावा आहेत. तिसर्या क्रमांकावरील फाफ डु प्लेसिसने तीन सामन्यांत १७३ धावा केल्या आहेत.
तर, पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने चार सामन्यांत आठ बळी घेतले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा रबाडा यात दुसऱ्या स्थानी आहे. रबाडाने तीन सामन्यांत सात गडी बाद केले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा राहुल चहर आहे. त्याने चार सामन्यांत सहा गडी बाद केले आहेत.