महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जाणून घ्या आयपीएलच्या प्रतिष्ठित 'टोप्यां'चे मानकरी - ऑरेंज कॅप आयपीएल २०२० न्यूज

लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने तीन सामन्यांत २२२ धावा केल्या आहेत. त्याच्यामागे राजस्थानविरुद्ध शतक झळकावणारा मयांक अग्रवाल आहे. तर, रबाडाने किंग्ज इलेव्हन पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीकडून 'पर्पल कॅप' आपल्याकडे घेतली आहे.

ipl 2020 orange cap and purple cap holders
जाणून घ्या आयपीएलच्या प्रतिष्ठित 'टोप्यां'चे मानकरी

By

Published : Sep 30, 2020, 4:43 PM IST

दुबई - किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने 'ऑरेंज कॅप' आपल्याकडे कायम ठेवली आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा पुन्हा 'पर्पल कॅप' मिळवण्यात यशस्वी झाला आहे. या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते.

लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने तीन सामन्यांत २२२ धावा केल्या आहेत. त्याच्यामागे राजस्थानविरुद्ध शतक झळकावणारा मयांक अग्रवाल आहे. मयांक राहुलच्या फक्त एक धावेने मागे आहे. तिसर्‍या क्रमांकावरील फाफ डु प्लेसिसने तीन सामन्यांत १७३ धावा केल्या आहेत.

रबाडाने किंग्ज इलेव्हन पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीकडून 'पर्पल कॅप' आपल्याकडे घेतली आहे. शमीच्या आधी रबाडाकडे ही कॅप होती. गोलंदाजांमध्ये रबाडाने तीन सामन्यांत सात गडी मिळवून प्रथम स्थान गाठले. दुसर्‍या क्रमांकावर शमी आहे, ज्याने तीन सामन्यांत सात गडी बाद केले आहेत, परंतु त्याची सरासरी कमी आहे. चेन्नईचा सॅम करन तीन सामन्यांमध्ये पाच बळी घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ हैदराबादविरुद्ध पराभूत झाल्यानंतर गुणतालिकेत दुसर्‍या क्रमांकावर घसरला आहे. राजस्थान रॉयल्स पहिल्या तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details