मुंबई - आयपीएलच्या रणसंग्रामाला आजपासून यूएईमध्ये सुरूवात होणार आहे. सलामीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात, रात्री ७ वाजून ३० मिनिटांनी अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याची उत्सुकता क्रिकेटप्रेंमीमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, सलामीच्या सामन्यापूर्वी जाणून घ्या, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची मागील तीन हंगामातील कामगिरी...
मुंबई इंडियन्स संघाने २०१७ च्या आयपीएल हंगामात चांगली कामगिरी नोंदवत तिसरे विजेतेपद पटकावले. या हंगामात रोहित शर्माला कर्णधाराला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने १७ सामन्यात खेळताना ३३३ धावा केल्या. यात ३ अर्धशतकांचा समावेश होता.
आयपीएल २०१८ चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी खराब ठरला. मुंबईचा संघ प्ले ऑफ पूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडला. यात रोहित शर्माला धावा करता आल्या नाहीत. त्याने १४ सामन्यात २८६ धावा केल्या. त्याच्या या फ्लॉप शोचा फटका संघालाही बसला होता. या हंगामात त्याने ९४ ही सर्वोच्च धावसंख्या केली होती.