मुंबई - चेन्नई सुपर किंग्ज संघासह महेंद्रसिंह धोनीसाठी आयपीएलचा तेरावा हंगाम आतापर्यंत फारसा चांगला गेलेला नाही. चेन्नईला आतापर्यंत सहा पराभव स्वीकारावे लागले आहेत. तसेच कर्णधार महेंद्रसिंह धोनीला देखील आपली छाप सोडता आलेली नाही. धोनीच्या खराब कामगिरीचे कारण पाकिस्तानचे माजी फलंदाज जावेद मियाँदाद यांनी सांगितलं आहे.
जावेद मियाँदाद यांनी सांगितलं की, आयपीएलमध्ये धोनीला फलंदाजी करताना मी पाहिलं. त्याचे फटके खेळताना टायमिंग आणि शरीराची हालचाल हा प्रमुख मुद्दा आहे. ज्यावेळी खेळाडू हा पूर्णपणे फिट नसतो, त्यावेळी असे होते. त्याच्या शरीराची हालचाल योग्य पद्धतीने होत नाही, टायमिंग चुकते. त्यामुळे आता धोनीला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.'