हैदराबाद-सोमवारी राजस्थान आणि चेन्नईमध्ये लढत झाली. यामध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नईवर विजय मिळवला. राजस्थानने चेन्नईचा तब्बल 7 गडी राखून पराभव केला. हा चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा 200 वा सामना होता. या सामन्यात राजस्थान रॉयलचा फलंदाज जोस बटलर याने दमदार कामगिरी केली. त्याने 70 धावा फटकावत राजस्थानला विजय मिळवून दिला. धोनी बटलरच्या खेळीने प्रभावित झाला. त्याने आपल्या 200 व्या सामन्यातील जर्सी बटलरला भेट देऊन, त्याचे कौतुक केले.
..म्हणून धोनीने बटलरला गिफ्ट केली आपल्या 200 व्या आयपीएल सामन्यातील जर्सी - महेंद्र सिंह धोनी और जोस बटलर
महेंद्र सिंह धोनीने आपल्या 200 व्या आयपीएल सामन्यातील जर्सी बटलरला भेट दिली आहे. काल जस्थानने चेन्नईचा तब्बल 7 गडी राखून पराभव केला. हा चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा 200 वा सामना होता. या सामन्यात राजस्थान रॉयलचा फलंदाज जोस बटलर याने दमदार कामगिरी केली. धोनीने आपली जर्सी देऊन, त्याचे कौतुक केले.
महेंद्र सिंग धोनी
चन्नईने काल झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र राजस्थानच्या गोलंदाजांसमोर चन्नईच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून अवघ्या 125 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने अवघ्या 3 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले. यामध्ये बटलरचे महत्वपूर्ण योगदान होते. त्याला मॅन ऑफ मॅचने सन्मानित करण्यात आले.