अबुधाबी -क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव या दोघांच्या चमकदार कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सने पाच गडी आणि २ चेंडू राखून दिल्लीवर विजय मिळवला. शेवटच्या रोमहर्षक षटकात कृणाल पांड्याने दोन चौकार मारत सामना नावावर केला. या विजयामुळे मुंबई इंडियन्सने पुन्हा अव्वलस्थानी झेप घेतली आहे.
आयपीएलमध्ये रविवारी दोन मुंबईकर कर्णधारांमध्ये लढत झाली. अबुधाबीच्या शेख झायेद मैदानावर रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ आणि श्रेयस अय्यरचा दिल्ली कॅपिटल्स संघ एकमेकांसमोर उभे ठाकले. नाणेफेक जिंकलेल्या दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला १६३ धावांचे आव्हान दिले. मुंबई इंडियन्सकडून क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी ५३ धावा काढत संघाचा विजय निश्चित केला. त्यानंतर इशान किशनने २८ धावा काढत संघाची स्थिती मजबूत केली. मुंबई इंडियन्सने २ चेंडू आणि पाच गडी राखून दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला.
सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या खेळीमुळे दिल्लीने मुंबईविरुद्ध २० षटकात ४ बाद १६२ धावा केल्या. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ सामन्याच्या पहिल्याच षटकात बाद झाला. त्याला बोल्टने माघारी धाडले. यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना खेळणारा अंजिक्य रहाणे पृथ्वीनंतर मैदानात आला. सुंदर कव्हर ड्राईव्ह खेळत त्याने आपल्या डावाला सुरुवात केली. १५ धावांवर असताना त्याला कृणाल पांड्याने पायचित पकडले. रहाणेच्या खेळीत ३ चौकारांचा समावेश होता. रहाणे बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि धवनची जोडी मैदानावर स्थिरावली. त्यांनी संघाची धावसंख्या शंभरपार नेली. अय्यरने ५ षटकारांसह ४२ धावा केल्या. अय्यरला कृणालनेच बाद केले. शिखर ५२ चेंडूत ६९ धावांवर नाबाद राहिला. त्याने ६ चौकार आणि एका षटकारासह संयमी खेळी केली. दिल्लीने अंजिक्य रहाणे आणि अॅलेक्स कॅरीला संघात स्थान दिले असून शिमरोन हेटमायर आणि ऋषभ पंतला विश्रांती दिली होती.
LIVE UPDATE :
- स्टॉइनिसने पांड्याला केले बाद.
- मुंबईला चौथा धक्का, पांड्या बाद.
- मुंबईला विजयासाठी ३० चेंडूत ३३ धावांची गरज.
- पंधरा षटकानंतर मुंबईच्या ३ बाद १३० धावा.
- हार्दिक पांड्या मैदानात.
- सूर्यकुमार बाद, रबाडाने धाडले माघारी.
- सूर्यकुमारचे अर्धशतक, खेळीत ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश.
- सूर्यकुमार अर्धशतकाजवळ.
- मुंबईला विजयासाठी ४८ चेंडूत ७३ धावांची गरज.
- इशान किशन मैदानात.
- डी कॉक ५३ धावांवर बाद, अश्विनला मिळाला बळी.
- डी कॉकचे अर्धशतक, खेळीत ३ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश.
- सात षटकानंतर डी कॉक ४० तर सूर्यकुमार ६ धावांवर नाबाद.
- डी कॉक अर्धशतकाजवळ.
- पाच षटकानंतर मुंबईच्या १ बाद ३१ धावा.
- सूर्यकुमार मैदानात.
- रोहित अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर झेलबाद.
- मुंबईच्या पहिल्या षटकात बिनबाद ३ धावा.
- कगिसो रबाडा टाकतोय दिल्लीसाठी पहिले षटक.
- मुंबईचे सलामीवीर मैदानात.
- २० षटकात दिल्लीच्या ४ बाद १६२ धावा.
- शिखर धवन ६९ धावांवर नाबाद.
- अॅलेक्स कॅरी मैदानात.
- स्टॉइनिस धावबाद.
- धवनचे अर्धशतक, खेळीत ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश.
- १४.४ षटकानंतर दिल्लीच्या ३ बाद १०९ धावा.
- स्टॉइनिस मैदानात.
- दिल्लीचा कर्णधार अय्यर ४२ धावांवर बाद, कृणाल पांड्याचा दुसरा बळी.
- बारा षटकानंतर धवन ३६ तर अय्यर ३३ धावांवर नाबाद.
- दहा षटकानंतर दिल्लीच्या २ बाद ८० धावा.
- आठ षटकानंतर धवन २४ तर, अय्यर १६ धावांवर नाबाद.
- आठ षटकानंतर दिल्लीच्या २ बाद ६१ धावा.
- पाच षटकात दिल्लीच्या २ बाद ३२ धावा.
- श्रेयस अय्यर मैदानात.
- रहाणेच्या खेळीत १५ धावा.
- दिल्लीला दुसरा धक्का, रहाणे कृणालच्या गोलंदाजीवर पायचित.
- पहिल्या षटकात दिल्लीच्या १ बाद ७ धावा.
- अजिंक्य रहाणे मैदानात.
- पहिल्या षटकात पृथ्वी बाद, हार्दिकने घेतला झेल.
- पृथ्वीकडून सामन्याचा पहिला चौकार.
- ट्र्रेंट बोल्टकडून मुंबईच्या गोलंदाजीची सुरुवात.
- दिल्लीचे सलामीवीर शॉ-धवन मैदानात.
- नाणेफेक जिंकून दिल्लीचा फलंदाजीचा निर्णय.
- थोड्याच वेळात होणार नाणेफेक.