महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२० : नाद नाय करायचा..! मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा जिंकलं विजेतेपद - mumbai win ipl 2020

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ५ गडी राखून धुव्वा उडवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

IPL 2020 MI VS DC Final MATCH Live Updates:
IPL २०२० FINAL : मुंबईचा नाद नाय करायचा...! इंडियन्सचा जेतेपदाचा 'पंच'

By

Published : Nov 10, 2020, 7:05 PM IST

Updated : Nov 11, 2020, 5:53 AM IST

दुबई - मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ५ गडी राखून धुव्वा उडवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. दुबईच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळींच्या जोरावर मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीचे हे आव्हान मुंबईने ५ गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. कर्णधार रोहित शर्माने ६८ धावांची तडाकेबंद खेळी केली. तर इशान किशनने नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. मुंबईचे हे पाचवे आयपीएल विजेतेपद ठरले.

दिल्लीच्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डी कॉक आणि रोहित शर्मा या जोडीने ४.१ षटकात ४५ धावांची सलामी दिली. स्टॉयनिसने डी कॉकला (२०) बाद करत ही जोडी फोडली. यानंतर सूर्यकुमार आणि रोहितने फटेकबाजी करत दिल्लीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.

रोहितच्या चुकीच्या कॉलवर सूर्यकुमार यादव धावबाद झाला. त्याने १९ धावा केल्या. यानंतर रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले. नार्जियाला मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित ललित यादवकडे झेल देऊन बसला. त्याने ५१ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ६८ धावांची खेळी केली. रोहित बाद झाल्यानंतर किशन आणि पोलार्ड ही जोडी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करेल असे वाटत होते. तेव्हा रबाडाने पोलार्डला माघारी पाठवले. यानंतर किशनने नाबाद ३३ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सलामीला आलेल्या मार्कस स्टॉयनीसला पहिल्याच चेंडूवर झेलबाद होऊन परतावे लागले. ट्रेंट बोल्टने त्याला माघारी धाडले. यानंतर अजिंक्य रहाणे देखील २ धावा काढून बाद झाला. त्याला बोल्टने डी कॉककरवी झेलबाद केले.

रहाणे बाद झाल्यानंतर दिल्लीची अवस्था २.४ षटकात २ बाद १६ अशी केविलवानी झाली होती. अशात जयंत यादवने दिल्लीला मोठा झटका दिला. त्याने अप्रतिम लयीत असलेला शिखर धवनला क्लिन बोल्ड केले. धवनने ३ चौकारांसह १३ चेंडूत १५ धावांवर केल्या. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या जोडीने चौथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी करत दिल्लीला शंभरी गाठून दिली.

आयपीएल २०२० मध्ये पंतने आपले पहिलेवहिले अर्धशतक झळकावले. कुल्टर नाइलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना पंत हार्दिक पांड्याकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने ३८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह खेचत ५६ धावा केल्या. अय्यरने दुसरी बाजू लावून धरत ४० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हेटमायर बोल्टच्या गोलंदाजीवर ५ धावांवर बाद झाला. यानंतर अखेरच्या षटकात अक्षर पटेल बाद झाला. तेव्हा अय्यरने ५० चेंडूत नाबाद ६५ धावा केल्या. मुंबईकडून बोल्टने ३ गडी टिपले. तर कुल्टर नाइलने २ गडी बाद केले. एक विकेट जयंत यादवने घेतली.

Last Updated : Nov 11, 2020, 5:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details