महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२० : केकेआरची 'चॅम्पियन'पदासाठी तयारी सुरू, 'हे' दोन दिग्गज खेळाडू घेतले संघात - david hussey as chief mentor

डेव्हिड हसी आणि कायले मिल्स हे दोघेही नव्यानेच नियुक्त करण्यात आलेला कोलकाता संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडम मॅक्युलमच्या अंतर्गत काम करणार आहेत. मॅक्युलम हा कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सदस्य राहिला आहे. आगामी हंगाम २०२० साठी त्याची मुख्य प्रशिक्षकपदी काही दिवसांपूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे.

IPL २०२० : केकेआरची 'चॅम्पियन'साठी तयारी सुरू, या दोन दिग्गज खेळाडूंना घेतले संघात

By

Published : Oct 6, 2019, 7:24 PM IST

कोलकाता - आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या २०२० हंगामासाठी कोलकाता नाइट रायडर्संनी जोरादार तयारी सुरू केली आहे. संघ व्यवस्थापनाने स्पर्धा जिंकण्याच्या उद्देशाने, बदल सुरू केले आहेत. यात शनिवारी एक बदल पाहायला मिळाला. तो बदल म्हणजे, आगामी २०२० च्या आयपीएल हंगामासाठी कोलकाताने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड हसीला मुख्य मार्गदर्शक म्हणून तर न्यूझीलंडचा माजी गोलंदाज कायले मिल्सला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

साभार केकेआर ट्विटर : डेव्हिड हसी, ब्रँडम मॅक्युलम आणि कायले मिल्स

डेव्हिड हसी आणि कायले मिल्स हे दोघेही नव्यानेच नियुक्त करण्यात आलेला कोलकाता संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडम मॅक्युलमच्या अंतर्गत काम करणार आहेत. मॅक्युलम हा कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सदस्य राहिला आहे. आगामी हंगाम २०२० साठी त्याची मुख्य प्रशिक्षकपदी काही दिवसांपूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे.

(फाईल फोटो) शाहरुख खान संघाला प्रोत्साहन देताना..

केकेआरचे साईओ वेंकी मैसूर यांनी डेव्हिड हसी आणि कायले मिल्स यांचे कोलकाता नाइट रायडर्सच्या परिवारात स्वागत करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी हसी आणि मिल्सकडे दांडगा अनुभव आहे, याचा फायदा संघाला होईल, यावर आमचा विश्वास असून दोनही खेळाडू आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडतील, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -IND Vs SA : टीम इंडियाची आफ्रिकेवर २०३ धावांनी मात, शमीचा 'पंच' तर जडेजाचा 'चौकार'

हेही वाचा -रोहित है तो मुमकिन है!.. 'या' विक्रमामध्ये रोहितच्या आसपासही कोणी नाही

ABOUT THE AUTHOR

...view details