महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2020 : 'युएई रेडी'; राजस्थान, पंजाब संघ युएईला रवाना - किंग्ज इलेव्हन पंजाब

आयपीएल स्पर्धेच्या तयारीसाठी सर्व संघांनी कंबर कसली आहे. काही तासांपूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आणि राजस्थान रॉयल्स संघ युएईसाठी रवाना झाला आहे.

IPL 2020 : Kings XI Punjab, Rajasthan Royals the firsts to leave for UAE
IPL 2020 : युएई रेडी..! राजस्थान, पंजाब संघ युएईला रवाना

By

Published : Aug 20, 2020, 3:16 PM IST

मुंबई - आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळला जाणार आहे. याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. या हंगामाची सुरूवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. आता या स्पर्धेच्या तयारीसाठी सर्व संघांनी कंबर कसली आहे. काही तासांपूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आणि राजस्थान रॉयल्स संघ युएईसाठी रवाना झाला आहे.

भारतातील कोरोनाचा वाढता प्रसार पाहून बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा युएईमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्व संघाच्या व्यवस्थापनाने आपल्या खेळाडूंच्या कोरोना चाचण्या घेण्याचे ठरवले. चाचणी निगेटिव्ह आली तरच खेळाडूंना युएईला जाण्याची परवानगी देण्यात येत आहे. काही तासांपूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आणि राजस्थान रॉयल्स संघ युएईसाठी रवाना झाले. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

राजस्थान रॉयल्स संघाने 'युएई रेडी' असे कॅप्शन देत खेळाडूंचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यात काही नवोदित खेळाडूंना टॅग करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पंजाब संघाने शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी, संघाचे प्रशिक्षक आणि 'रणजी' किंग वासिम जाफर, मनदीप सिंग हे खेळाडू दिसत आहेत. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत यागनिक यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना युएईला जाता येणार नाही.

हेही वाचा -मोदी धोनीला टी-२० वर्ल्डकप खेळण्यास सांगू शकतात - शोएब अख्तर

हेही वाचा -भारताच्या अजून एका माजी क्रिकेटपटूचे निधन, कुंबळेने वाहिली श्रद्धांजली

ABOUT THE AUTHOR

...view details