अबूधाबी- आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरूवात होण्याआधीच चेन्नईचे १३ सदस्य, बीसीसीआयच्या वैद्यकीय टीममधील एक जण आणि दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ कोरोनाबाधित झाले. यामुळे खेळाडूंसह फ्रेंचायझी चिंताग्रस्त आहेत. अशात एक खेळाडू मात्र बिनधास्त आहे. मला कोरोना झाला तरी मी लढेन, असा आत्मविश्वास, त्या खेळाडूने व्यक्त केला आहे.
शिखर धवन आयपीएलसाठी युएईमध्ये आहे. त्याला क्रिकेट खेळताना कोरोनाची भिती वाटत नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना धवन म्हणाला की, 'मला माझ्या शरीरावर पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे कोरोनाला मी घाबरत नाही. मला माहिती आहे की, मला देखील कोरोनाची लागण होऊ शकतो. पण मी कोरोनाशी लढू शकतो. सद्या आम्ही सर्व सुरक्षेचे नियम पाळत आहोत. आतापर्यंत आमच्या ८ ते ९ वेळा कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. या सर्व निगेटिव्ह आहेत.'