मुंबई -आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच रविवारी एकाच दिवशी तीन सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या. पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. तर, दुसऱ्या सामन्यात दोन सुपर ओव्हर झाल्या. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात हा सामना झाला. यात पहिल्यांदा दोन्ही संघांनी समान धावा केल्या. यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. तेव्हा सुपर ओव्हर देखील बरोबरीत सुटली. यामुळे पुन्हा आणखी एक सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यात पंजाबने बाजी मारली. या सामन्यात दुसऱ्यांदा ज्यावेळी सुपर ओव्हर खेळवण्यात आली, त्यावेळी फलंदाजीसाठी क्विंटन डी कॉक तसेच केएल राहुल फलंदाजीला उतरला नव्हता. तसेच मुंबईने जसप्रीत बुमराहला गोलंदाजी दिली नाही. याला आयपीएलचा एक नियम कारणीभूत आहे. वाचा काय आहे सुपर ओव्हरचा तो नियम...
काय आहेत सुपर ओव्हरचे नियम -
- एखादा खेळाडू सुपर ओव्हरमध्ये बाद झाला तर, त्याला त्या सामन्यात आणखी एखादी सुपर ओव्हर झाल्यास, त्यामध्ये फलंदाजी करता येणार नाही.
- एका गोलंदाजांला एका सामन्यात एकच सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करता येईल.
- याशिवाय दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पहिल्या सुपर ओव्हरचे सर्व नियम लागू राहतील.