अबुधाबी -चेन्नई सुपर किंग्जला एक मोठा धक्का बसला आहे. चेन्नई संघाचा स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो इंडियन प्रीमिअर लीगच्या १३ व्या पर्वात आणखी काही सामने खेळू शकणार नाही. याची माहिती चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली.
कॅरेबियन लीग स्पर्धेदरम्यान ब्राव्होला दुखापत झाली होती. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो फायनलमध्ये खेळला नव्हता. त्याला 'फिट' होण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी लागेल. त्यामुळे ब्राव्हो काही सामने खेळू शकणार नाही.
दरम्यान, ब्राव्होच्या जागेवर इंग्लंडचा २२ वर्षाय अष्टपैलू सॅम कुरेनला स्थान मिळाले आहे. त्याने मुंबई विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात ६ चेंडूंमध्ये १८ धावांची खेळी करीत चेन्नईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.