शाहजाह - दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर कोलकाता नाइट रायडर्स संघावर टीका होत आहे. या सामन्यानंतर कोलकाताचा माजी कर्णधार गौतम गंभारने कोलकाताचा सध्याचा कर्णधार दिनेश कार्तिकला एक मोलाचा सल्ला दिला आहे. आंद्रे रसेल आणि इयॉन मॉर्गन यांच्यानंतर कार्तिकने फलंदाजीला यायला हवं, असे गंभीरने म्हटलं आहे.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कार्तिकने ८ चेंडूत ६ धावाच केल्या. तसेच तो या सामन्यात मॉर्गनच्या आधी ५ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता आणि विशेष म्हणजे मॉर्गनने त्याच्या नंतर येऊनही १८ चेंडूत तुफानी ४४ धावांची खेळी केली. तसेच राहुल त्रिपाठीनेही ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना १६ चेंडूत ३६ धावा केल्या. त्यामुळे कार्तिकवर टीका होत आहे.
गंभीर म्हणाला, 'दिनेश कार्तिकने मॉर्गन आणि रसेलनंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे. तसेच सुनील नरेनने ८ व्या किंवा ९ व्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी. तसेच राहुल त्रिपाठीला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले पाहिजे.'