दुबई - मागील काही दिवसांपासून संकटावर संकट झेलणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जसाठी एक चांगली बातमी आहे. अनुभवी फलंदाज डु-प्लेसिस सीएसके संघासोबत जुळण्यासाठी युएईमध्ये पोहोचला आहे. डु-प्लेसिस सोबत वेगवान गोलंदाज लुंगी एनिगिडीही युएईत दाखल झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू डु-प्लेसिस, लुंगी एनगिडी आणि कॅगिसो रबाडा आयपीएल खेळण्यासाठी युएईमध्ये दाखल झाले आहेत. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये खेळवण्यात येत असून याची सुरूवात १९ सप्टेंबर पासून होणार आहे. तर अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळला जाईल.
डु-प्लेसिस आणि एनगिडी हे सीएसकेचे सदस्य आहेत. तर रबाडा दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू आहे. दोन्ही संघाच्या फ्रेंचायझींनी आपल्या अधिकृत्त ट्विटर अकाऊंटवरु हे तीनही खेळाडू युएमध्ये दाखल झाले असल्याचे सांगितले आहे. याचा त्यांनी फोटोही पोस्ट केला आहे.