दुबई -आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि सलामीवीर म्हणून संधी मिळालेल्या वृद्धिमान साहाच्या फटकेबाजीमुळे सनरायझर्स हैदराबादने दिल्लीसमोर २० षटकात २१९ धावांचा डोंगर उभारला. हे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर मनीष पांडेने धावगतीत सातत्य राखत संघाची धावसंख्या दोनशेपार पोहोचवली.
या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांनी चाहत्यांची साफ निराशा केली. शिखर धवन शून्यावर माघारी परतला. तर, मार्कस स्टॉयनीस देखील ५ धावांवर बाद झाला. शिमरॉन हेटमायर-अजिंक्य रहाणे जोडीने थोडी फटकेबाजी केली, पण रहाणे २६ तर हेटमायर १६ धावांवर तंबूत परतला. पाठोपाठ अक्षर पटेल (१) आणि कगिसो रबाडाही (३) बाद झाले. ऋषभ पंतने काही काळ संघर्ष केला, पण त्याला ३६ धावा काढून माघारी परतावे लागले. यानंतर दिल्लीचा डाव १३१ धावांवर आटोपला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय दिल्ली कॅपिटल्सला अंगउलट आला. आज हैदराबादने सलामीवीर जॉनी बेअरस्टोला बसवून वृद्धिमान साहाला संधी दिली. साहा-वॉर्नरने सलामीला येत दिल्लीच्या गोलंदाजांची पिसं काढली. वॉर्नरने ३४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६६ धावा फटकावल्या. तर, वृद्धिमान साहाने ४५ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी कर ८७ धावा कुटल्या. या दोघांनी १०७ धावांची दमदार सलामी दिली. वॉर्नरला रविचंद्रन अश्विनने अक्षर पटेलकरवी झेलबाद केले. तर, साहा नॉर्कियाच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या मनीष पांडेने नाबाद ४४ धावांची खेळी करत संघाला दोनशेपार पोहोचवले. लीगमध्ये पर्पल कॅपच्या शर्यतीत प्रथम असणाऱ्या कगिसो रबाडाला चार षटकात ५४ धावा फटकावल्या गेल्या. तर, अश्विनलाही ३ षटकात ३५ धावा चोपल्या गेल्या.
LIVE UPDATE :
- हैदराबादचा दिल्लीवर 88 धावांनी विजय
- दिल्लीला 9 वा धक्का ...आर.अश्विन माघारी
- दिल्लीला विजयासाठी ४२ चेंडूत १३७ धावांची गरज.
- तेरा षटकानंतर दिल्लीच्या ६ बाद ८३ धावा.
- कगिसो रबाडा मैदानात.
- चार षटकात राशिद खानने दिल्या ७ धावा.
- अक्षर पटेल बाद, राशिदचा तिसरा बळी.
- अक्षर पटेल मैदानात.
- विजय शंकरला मिळाला बळी.
- दिल्लीचा पाचवा गडी बाद, अय्यर ७ धावांवर माघारी.
- दिल्लीला विजयासाठी ६० चेंडूत १४७ धावांची गरज.
- दहा षटकानंतर दिल्लीच्या ४ बाद ७३ धावा.
- दिल्लीला विजयासाठी ७८ चेंडूत १६५ धावांची गरज.
- राशिदचा डबल धमाका, अंजिक्य रहाणे २६ धावांवर पायचित.
- ऋषभ पंत मैदानात.
- राशिद खानच्या पहिल्याच चेंडूवर हेटमायर बाद.
- सहा षटकानंतर दिल्लीच्या २ बाद ५४ धावा.
- दिल्लीला तिसरा धक्का, हेटमायर १६ धावांवर बाद.
- पाच षटकात दिल्लीच्या २ बाद ३४ धावा.
- हेटमायर मैदानात.
- दिल्लीला दुसरा धक्का, स्टॉइनिस बाद, नदीमला मिळाला बळी.
- पहिल्या षटकात दिल्लीच्या बिनबाद ६ धावा.
- मार्कस स्टॉइनिस मैदानात.
- शिखर धवन त्याच्या पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद.
- संदीप शर्मा टाकतोय सलामीचे षटक.
- दिल्लीचे सलामीवीर रहाणे-धवन मैदानात.
- २० षटकात हैदराबादच्या २ बाद २१९ धावा.
- मनीष पांडे ४४ धावांवर नाबाद.
- १८ षटकानंतर हैदराबादच्या २ बाद २०२ धावा.
- १४.३ षटकानंतर हैदराबादच्या २ बाद १७० धावा.
- साहा ४५ चेंडूत ८७ धावा करून माघारी, खेळीत १२ चौकार आणि २ षटकारांचा समावेश.
- वृद्धीमान साहाचे २७ चेंडूत अर्धशतक.
- दहा षटकानंतर हैदराबादच्या १ बाद ११३ धावा.
- मनीष पांडे मैदानात.
- वॉर्नरच्या खेळीत ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश.
- हैदराबादला पहिला धक्का, अश्विनच्या गोलंदाजीवर वॉर्नर ६६ धावांवर झेलबाद.
- वॉर्नर-साहाची शतकी भागिदारी.
- सहा षटकानंतर साहा २२ धावांवर नाबाद.
- वॉर्नरचे अर्धशतक, खेळीत ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश.
- पाच षटकात हैदराबादच्या बिनबाद ५५ धावा.
- दोन षटकानंतर हैदराबादच्या बिनबाद २० धावा.
- पहिल्या षटकात हैदराबादच्या बिनबाद ५ धावा.
- एनरिक नॉर्किया टाकतोय दिल्लीसाठी सलामीचे षटक.
- हैदराबादचे सलामीवीर साहा-वॉर्नर मैदानात.
- नाणेफेक जिंकून दिल्लीचा गोलंदाजीचा निर्णय.
- थोड्याच वेळात होणार नाणेफेक.