आबुधाबी - आयपीएल २०२०मध्ये आजयंगिस्तान दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायजर्स हैदराबादशी होत आहे. तेराव्या हंगामात दिल्लीचा संघ अजेय राहत दोन विजयासह अव्वलस्थानी कायम आहे. तर दुसरीकडे दोन पराभवासह हैदराबादचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. आज दिल्ली विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाली आहे. तर, हैदराबाद पहिला विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. उभय संघाच्या आकडेवारीवरुन आजच्या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरू शकतो, पाहा...
- हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास सनरायजर्सचा संघ दिल्लीला भारी पडला आहे. हैदराबादने आतापर्यंत ९ सामने जिंकले आहेत तर दिल्लीला ६ सामन्यात बाजी मारता आली आहे.
- उभय संघात झालेल्या पहिल्या ६ सामन्यांत दिल्लीला फक्त एक विजय मिळवता आला होता. पण त्यानंतरच्या ९ सामन्यात दिल्लीने ५ विजय मिळवले आहेत.
- भारताबाहेरची आकडेवारी पहिल्यास सहा वर्षांपूर्वी दुबईमध्ये दोन्ही संघ एकमेकांविरोधात समोरासमोर आले होते. यात सनरायजर्सने विजय मिळवला होता.
- सनरायजर्स विरोधात दिल्लीच्या ऋषभ पंतने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ९ सामन्यात खेळताना ३२८ धावा केल्या आहेत.
- दिल्ली विरोधात खेळताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १० सामन्यात ३२९ धावा जमवल्या आहेत.
- दिल्लीच्या किमो पॉलने हैदराबाद विरुद्धच्या २ सामन्यात सर्वाधिक ६ गडी बाद केले आहेत.
- दुसरीकडे हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने दिल्लीचे १३ गडी टिपले आहेत.