दुबई -सलामीवीर नितीश राणाच्या झुंजार ८७ धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र ऋतुराज गायकवाडच्या ७२ धावांच्या जोरावर आणि अखेरच्या षटकांमध्ये रवींद्र जडेजाने केलेल्या धमाकेदार फटकेबाजीमुळे विजय खेचून आणता आला. जडेजाने सलग दोन षटकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
अखेरच्या षटकांमध्ये रवींद्र जडेजाने धमाकेदार फटकेबाजी करत चेन्नईसाठी विजय खेचून आणला. जडेजाने सलग दोन षटकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऋतुराजने यावेळी ५३ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ७२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. जडेजाने यावेळी ११ चेंडूत २ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ३१ धावांची फटकेबाजी केली.
नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा शुबमन गिल आणि नितीश राणा या जोडीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी सलामी दिली. दोघांनी ५३ धावांची भागीदारी झाल्यानंतर कर्ण शर्माने गिलला क्लिन बोल्ड करत केकेआरला पहिला धक्का दिला. गिलने १७ चेंडूत ४ चौकारासह २६ धावा केल्या. यानंतर केकेआरच्या डावाला लागलेली गळती लागली. सुनील नरेन (७) , रिंकू सिंह (११) हे स्वस्तात माघारी परतले. कर्णधार मॉर्गनला वरच्या फळीत फलंदाजीला येणे अपेक्षित होते. पण त्याने रिंकू सिंहला वरच्या फळीत फलंदाजीला पाठवले. यामुळे महत्वाच्या षटकांमध्ये केकेआरचा संघ अपेक्षित धावगती राखू शकला नाही.
नितीश राणाने एक बाजू पकडून ठेवली. त्याने कर्णधार मॉर्गनसोबत भागीदारी करत संघाचा डाव पुन्हा एकदा सावरला. चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत नितीश राणाने ६१ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह ८७ धावा केल्या. लुंगी एनगिडीने त्याला बाद केले. अखेरीस कर्णधार मॉर्गन (१५) आणि दिनेश कार्तिक (नाबाद २१) यांनी फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिली. चेन्नईकडून एनगिडीने २ तर सँटनर, जडेजा, शर्मा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील ४९वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जात आहे. कोलकातासाठी हा सामना करा किंवा मरा स्थितीतील आहे. तर चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलेले आहे. यामुळे त्यांच्यासाठी हा सामना केवळ औपचारिकता राहिला आहे. चेन्नईने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.
कोलकाताने आपल्या संघात एक बदल केला असून त्यांनी प्रसिद्ध कृष्णाच्या जागेवर फलंदाज रिंकू सिंगला स्थान दिले आहे. तर चेन्नईने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. त्यांनी फाफ डु प्लेसिस, इम्रान ताहीर आणि मोनू कुमारला बाहेर केले आहे. त्यांच्या जागेवर शेन वॉटसन, लुंगी एनगिडी आणि कर्ण शर्माला घेतले आहे.